ऍड. विठ्ठल यदू कांबळे

विधी अधिकारी, मोतीलाल ओस्वाल ग्रुपमधे,

मराठी माजी विद्यार्थी (२००५ – २००८)

            २००५ साली रामनिरंजन झुनझुनवाला महाविद्यालयात मी प्रवेश घेतला.कला शाखेचा विद्यार्थी असल्याने मला नृत्य,अभिनय यासारख्या कलेत पारंगत होण्याची संधी मला महाविद्यालयामुळे मिळाली. महाविद्यालयीन व आंतरमहाविद्यालयीन वकृत्व, वादविवाद स्पर्धा यासह इतर स्पर्धेत सहभागी होऊन संवादाची क्षमता वाढविली.अंतिम वर्षात मराठी विषय घेऊन पदवी शिक्षण पूर्ण केले. खऱ्या अर्थाने येथून माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली. मराठी विभागाच्या प्रमुख डॉ. स्नेहा देऊस्कर मॅडम, डॉ.नीलांबरी कुलकर्णी मॅडम यांच्या योग्य मार्गदर्शनामुळे मी उच्चशिक्षित झालो. संज्ञापन व पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर मी माध्यमात ६ ते ७ वर्ष काम केले. त्यानंतर एल.एल.बीचे शिक्षण पूर्ण केले आणि आज एका नामांकित मोठ्या ग्रुप समूहामध्ये विधी अधिकारी पदावर कार्यरत आहे.माझे आयुष्य घडण्यात रामनिरंजन झुनझुनवाला महाविद्यालयाचा फार  मोठा वाटा आहे.

Skip to content