MARATHI

मराठी विभाग

विभागाविषयी –

मराठी विभागाची स्थापना महाविद्यालयाच्या स्थापनेपासून १९६३ साली झाली. मराठी विभागात  मराठी भाषा व साहित्य स्नातक अभ्यासक्रम (तृतीय वर्षात ६ अभ्यासपत्रिकांसह) – B.A. -MARATHI (RJAUMAR)उपलब्ध आहे.

मराठी भाषा व वाङ्मय मंडळा विषयी –

१९६३ सालापासून मराठी भाषा व वाङ्मय मंडळ मराठी विभागाशी संलग्न आहे. मराठी विभागाच्या स्थापनेपासूनच अस्तित्वात आलेले मराठी भाषा व वाङ्मय मंडळ हे महाविद्यालयातील सगळ्यात जुने मंडळ आहे. वाङ्मय मंडळातर्फे १९८१ सालापासून स्व. श्री. जुगलदास दामोदर मोदी मानचिन्ह आंतरमहाविद्यालयीन मराठी  वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली जाते. त्याशिवाय दरवर्षी काव्यपूर्ती स्पर्धा, वृत्तांतलेखन स्पर्धा , साहित्य-चित्र- वेध स्पर्धा, ‘सूरां मी वंदिले’ गीत गायन स्पर्धा यांसारख्या स्पर्धांचे आयोजन केले जाते.जागतिक मराठी भाषा दिन व मराठी भाषा संवर्धन पंधरवडा यांच्या निमित्तानेही भाषा व वाङ्मयविषयक विविध  उपक्रम राबविले जातात. त्यात विद्यार्थी , प्राध्यापक , शिक्षकेतर कर्मचारीवर्ग यांच्यासाठी विविध स्पर्धा व  विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

माजी विभागप्रमुख डॉ. सुधा जोशी पुरस्कृत ‘कथारंग’ हा कथनात्म साहित्याशी निगडीत असणारा कार्यक्रम हे वाङ्मय मंडळाच्या कार्यक्रमांचे वैशिष्ट्य आहे.

माजी विभागप्रमुख डॉ. सुधा जोशी यांच्या नेतृत्वाखाली बहरलेल्या मराठी विभाग आणि मराठी भाषा व वाङ्मय मंडळाचे ,मराठीतील कथनात्म साहित्याची समीक्षा आणि एकूण मराठी साहित्य संस्कृतीच्या संदर्भात महत्त्वाचे योगदान राहिलेले आहे.

विभागप्रमुख

डॉ. स्नेहा देऊस्कर
सहयोगी प्राध्यापक आणि मराठी विभागप्रमुख.
शैक्षणिक अर्हता- B.A., B.ED.,M.A.,SET ,PH.D

CONTACT DETAILS

संपर्क:

मराठी विभाग,
रामनिरंजन झुनझुनवाला महाविद्यालय,
घाटकोपर रेल्वे स्थानकासमोर,
घाटकोपर(पश्चिम),मुंबई-४०००८६

दूरध्वनी क्रमांक :

०२२-२५१५२७३१/ ०२२-२५१५१७६३

 

ई-पत्ता –

marathi@ rjcollege.edu.in
rjcollege@ rjcollege.edu.in

NOTICES

FACULTY

Marathi

team

डॉ. स्नेहा देऊस्कर

सहयोगी प्राध्यापक आणि मराठी विभागप्रमुख

डॉ. स्नेहा देऊस्कर

सहयोगी प्राध्यापक आणि मराठी विभागप्रमुख

B.A., B.ED.,M.A.,SET ,PH.D. रुजू होण्याची तारीख- २०/०६/१९९५. महाविदयालयाती

team

डॉ. नीलांबरी कुलकर्णी

सहयोगी प्राध्यापक

डॉ. नीलांबरी कुलकर्णी

सहयोगी प्राध्यापक

B.COM.,B.A., ,M.A.,SET,M.PHIL, PH.D. रुजू होण्याची तारीख- २०/०६/१९९९ (अर्धवेळ प्

विभागात उपलब्ध सुविधा

१२६ पुस्तके आणि १० सीडीज उपलब्ध असणारे विभागीय ग्रंथालय.

  • दृक्श्राव्य शैक्षणिक साधन (LCD projector) सुविधेसह वर्ग.

Jio Leased Line connection (50 Mbps)

ADMISSIONS

A candidate for being eligible for admission to the Three year Integrated course leading to the degree of Bachelor of Arts (B.A.) must have passed Higher Secondary School Certificate Examination (Std.XII) in Science conducted by the Maharashtra  State Board of Secondary and Higher Secondary Education or it’s equivalent in Science stream. Admission will be on merit.

e-resources

  • SWAYAM (Free Online Education)
  • ePathshala (A Gateway to all Postgraduate Courses)

 

 2,332 total views,  6 views today