श्री.गणेश गाडगे

विमा अभिकर्ता, भारतीय जीवन बीमा निगम,

मराठी माजी विद्यार्थी (२००६- २०११)

जेव्हा केव्हा मला एखाद्या महाविद्यालयाजवळून जाण्याचा प्रसंग येतो, तेव्हा तेव्हा मला माझ्या महाविद्यालयाची, रामनिरंजन झुनझुनवाला महाविद्यालयाची आठवण येते, माझ्या स्मृती चाळविल्या जातात आणि मी क्षणभर भूतकाळात जातो किंवा मग भूतकाळ वर्तमानकाळात येतो. मला आठवतात तिथले प्राध्यापक आणि त्यांची शिकविण्याची पद्धत! परिसरातील जनसामान्यांमध्ये असा प्रवाद प्रचलित आहे की हे महाविद्यालय विज्ञान शाखेसाठी प्रसिद्ध आहे. पण मित्रांनो हे महाविद्यालय कला शाखेसाठी देखील प्रचलित आहे. मी आज जर आयुष्यात यशस्वी झालो असेन तर हे केवळ मला इथे मिळालेल्या शिक्षणामुळेच. मला या महाविद्यालयाकडून जे मिळाले आहे, त्याची शब्दात व्याख्या करता येणार नाही.

Skip to content